Social Icons

Monday, December 20, 2010

Marathi Movie: Haapus


  • चित्रपट : हापूस 
  • निर्माता : संजय छाबरिया 
  • दिग्दर्शक  : अभिजित साटम 
  • संगीत : सलिल कुलकर्णी 
  • गीतकार : संदीप खरे 
  • कलाकार : मकरंद अनासपुरे, सुबोध भावे, मधुरा वेलंकर, शिवाजी साटम, पुष्कर शोत्री 


थोडक्यात समिक्षा: ’अण्णा गुरवांचा’ कोकणातल्या वानारवाडी गावात एक भितीयुक्त दरारा आहे. त्यांनी सांगितलेले भविष्य सहसा खोटे ठरत नाही. पंचांग, ज्योतिष, भविष्य यावर त्यांचा प्रचंड विश्वाच नाहीये तर तेवढाच अभ्यास सुध्दा आहे. घर आणि गाव त्यांच्या नियमावर चालतं. त्यांच्या विरोधात जाणारं कुणीही नाही. पण आज चक्क त्यांचा मुलगा अजित हाच त्यांच्या विरोधात ऊभा आहे. कारण काय तर अजितने संशोधन करुन तयार केलेला नवीन आंबा आणि बागेतला हापूस त्याला स्वतःला शहरात नेऊन विकायचा आणि अण्णांचा नेमका यालाच विरोध आहे. धंदा गुरव घराण्याला लाभणार नाही. तेव्हा अजितल साथ देईल तो त्याच्या सोबत बुडेल असं त्यांनी भाकीतच केलय. त्यातच अण्णांच्या तीन मुलींपैकी दोन जुळया मुली, अंकीता आणि अमृता लग्नाच्या झाल्या आहे आणि अण्णांच्या पत्रिका प्रेमापोटी त्यांची लग्न काही जुळत नाहीयेत..... त्यापैकी अमृता बंडखोर आहे आणि तिने अण्णांचे नियम धाब्यावर बसवले आहेत...... अंकीताचे बघायचे कार्यक्रम सुरु आहेत पण ती पडली आहे गावातल्या रिक्षावाल्याच्या. म्हणजे सुभ्याच्या प्रेमात. त्यात येतो एक मास्तर, मास्तर दिगंबर काळे फ्रॉम आंबेजोगाई. सुभ्याची मस्ती आणि अमृताचा मार झेलत मास्तर गुरवांच्या घरी पोहोचले. लवकरच त्यांच्या घरातला एल भाग होऊन जातो आणि अमृताच्या प्रेमात पडतो.

अण्णा आणि अजित याच्यातला वाद मात्र जास्त स्फोटक होतो जेव्हा ’छाजेड’ गावात यतो. वर्षानवर्ष वानारवाडीतला आंबा छाजेडने कवडीमोल किमतीला विकत घेऊन शहरात आणि परदेशात सोन्याच्या भावाला विकायला हे ठरलेलं. अजितचा यालाच विरोध आहे पण ’गुरवांनी धंदा करायचा नाही’ हे अण्णांच अंतिम विधान आहे. त्या गोंधळात भर म्हणून अण्णा अंकीताचं लग्न नेमंक घरी आलेल्या मास्तरशी ठरवतात. मास्तरच्या लक्षात येतं की हा सगळा घोळ अण्णांच्या पत्रिका आणि ज्योतिषाच्या वेडापायी निर्मान झाला आहे. तेव्हाच अण्णांच्या भुतकाळातलं एक धक्कादायक रहस्य समोर येतं. तिथेच आण्णांच्या या वेडाचं मूळ आहे. यावर ऊपाय म्हणून मास्तर एक खेळ रचतो. घरातली सगळी व्यक्ती या खेळात सामील होता. आजी ,अण्णांची पत्नी माई, अजितची बायको नंदा आणि घरातलं शेंडेफळ आनंदी हे सुध्दा. ठरल्याप्रमाणे फासे पडू लागतात आणि अण्णांच्या डोक्यातल खूळ कमी करण्यात सगळ्यांना यश येत. अण्णा अजितला मदत करायचं ठरवतात. नेमक तेव्हाच संपूर्ण गाव मात्र अजितच्या विरोधात जातं. कारण अर्थातच छाजेड. छाजेड. त्याच्या हातून वानारवाडीचा आंबा इतक्या सहजासहजी सुटु देईल हे शक्यच नव्हतं, एकीकडे अजित आणि गाव विरुध्द अण्णा अशी सुरु असलेली लढाई अचानक अजित आणि अण्णा विरुध्द गाव असं वळण घेते. छाजेडच्या शक्ती समोर. पैशासमोर आणि क्रौर्या समोर कोकणातल्या या सामान्य गुरव घराचा निभाव लागेल? वर्षानुवर्ष फळाचा राजा पिकवणाऱ्या कोकणातच्या बागावतदाराला त्याचा न्याय मिळवता येईल? या प्रश्नांच उत्तर म्हणजे ’हापुस’

No comments:

Post a Comment

 

Sample text

Sample Text

Sample Text