Social Icons

Tuesday, October 18, 2011

Marathi Movie: Fakta Ladh Mhana

  • चित्रपट: फक्त लढ म्हणा
  • निर्देशक: महेश मांजरेकर
  • दिग्दर्शकः संजय जाधव
  • संगीत: अवधूत गुप्ते
  • गीतकार: गुरु ठाकूर, जितेंद्र जोशी
  • कलाकार: महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भरत जाधव, अनिकेत विश्वासराव, संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, संतोष जुवेकर, संजय खापरे, वैभव मांगले, क्रांती रेडकर, अमृता खानविलकर, मनोज जोशी.

थोडक्यात समिक्षा: शॆतकऱ्यांच्या आत्महत्येवर आपण कित्येक चित्रपट पाहिले आहेत ज्यांमधे शॆतकऱ्यांची दुःखद परीस्थिती बघून आपल्याला रडू आले आहे. पण तॆ चित्रपट पाहून आपण नुसतेच रडलॊ, नुसतीच चर्चा केली की अरेरे, काय गरीब परीस्थिती आहे बाहेर. पण शॆतकऱ्यांच्या आत्महत्येवर असा कुठलाच चित्रपट निघाला नव्हता की ज्यामुळे आपलं रक्त आंतून सळसळेल किंवा ज्यामुळे आपण अन्यायविरुद्ध आपला आवाज उठवू. पण महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘फक्त लढ म्हणा’ हा तुलनात्मक्तेने खूप वेगळा आहे. हा चित्रपट आपल्या अंगावर काटे उभे करून आपलं रक्त आंतून सळसळवतो. ह्या चित्रपटात अभिनय केला आहे सचिन खेडेकर, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, अनिकेत विश्वासराव, संजय नार्वेकर, क्रांति रेडकर, इहेमांगी कवी, वैभव मांगले, संजय खापरे, संतोश जुवेकर, अमृता खानविलकर आणि स्वतः महेश मांजरेकर ह्यांनी. जसे तेल, मोहरी, जीरॆ, तिखट, मीठ इ हे सर्व घटक प्रमाणात असल्यावरंच भाजीला चव येते त्याचप्रमाणे ह्या चित्रपटात आवश्यक ते सर्व घटक प्रमाणात घातलेले आहेत. जणू आपण ह्याला एक मसाला चित्रपटंच म्हणूया. कोकणातल्या एका गावात, एक भ्रष्टाचारी मंत्री मधूसुधन पाटील(सचिन खेडेकर) हा शेतकऱ्यांची जमीन हडपून त्यांतून पैसे उकळवण्याचे काम करीत असतो. आणि तो हे सगळं त्याच्या दोन खास व्यक्तिंकडून करवून घेत असतो, त्याचा सख्खा भाऊ भास्कर पाटील(संजय खापरे) आणि वैभव कुलकर्णी(वैभव मांगले). त्याचे हे सगळे घॊटाळे उघडकीस आणू ईच्छीणाऱ्याची तो हत्या करतो. चित्रपटातली ही घटना आपल्याला थेट मुंबईत घेऊन जाते. मुंबईत एक कुख्यात गुंड बाबा भाईच्या(महेश मांजरेकरच्या) हाताखाली पाच माणसं काम करत असतात-तुकाराम(भरत जाधव), अ‍ॅलेक्स(अनिकेत विश्वासराव), सलीम(संतोष जुवेकर), जीतू(सिद्धार्थ जाधव), कानफाट्या(संजय नार्वेकर). ह्या पाचंही कलाकारांच्या भूमिकेची ओळख व्यवस्थित व्हावी म्हणून सुरुवातीला एक थरारक दृश्य दाखविण्यात आला आहे. त्यांनंतर अशा काही घटना घडतात की चित्रपट आपल्याला पून्हा कोकणातल्या त्या गावी घेऊन जातो. मंध्यंतरापर्यंत आपल्याला चित्रपटाच्या कथानकाचं स्वरुप हळूहळू समजू लागतं. पण चित्रपटाची खरी सुरुवात होते त्याच्या मंध्यंतरानंतर. अमृता खानविलकरची लावणीही आपल्याला बघायला मिळेल. तिच्य देखण्या रुपाची तारीफ करायला शब्द अपूरे पडतात. फक्त ह्या लावणीला पूर्ण महत्त्व नसून त्यात घडणाऱ्या घटनेला आहे. अर्धा चित्रपट त्या घटनेवर अवलंबून आहे आणि तीच घटना कथानकाला पुढे सरकवून चित्रपटाचा वेग वाढवते.

मानसी नाईकची कधीही न पाहिलेली दिलखेच अदा सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या गाण्यात दाखवलेली धमाल पहायला अवश्य जायलाच पाहिजे. त्यानंतर ही साधी गुंडांची टोळी मधूसुदन पाटीलची कशी वाट लावतात, हे थरारकपणे दाखविण्यात आले आहे. गुंड म्हटले की आपल्याला हिंसाचार आठवतो, पण ह्या चित्रपटात अजिबात हिंसाचार दाखवलेला नाही. ह्या चित्रपटाला मजबूती आली आहे तिचातल्या वजनदार संवादामुळे. ते संवाद आपल्याला आडवे पाडून हसवतात आणि तेच संवाद आपल्यात शक्तिचा संचार करतात. ह्या चित्रपटात एक प्रेम कहाणी सुद्धा दाखविण्यात आली आहे. कलाकारांविषयी सांगायचं झालं तर, प्रत्येक कलाकाराचा अभिनय दमदार आहे. एरवी साध्या-सुध्या भुमिका करणारे सचिन खेडेकर आणि संजय खापरे आपल्याला नकारात्मक भुमिकेत दिसणार आहेत. सिद्धार्थ जाधवला खूप गमतीशीर नाव देण्यात आले आहे. भरत जाधवच्या आवाजाचं डबिंग एका वेगळ्या कलाकाराने केल्यामुळे चित्रपटाला एक वेगळं स्वरुप मिळालं आहे. तो आवाज कोणत्या कलाकाराचा आहे हे तुम्हाला ओळखावे लागेल. ह्या चित्रपटात खूप सुंदर ठिकाणे दाखवलेली आहेत. सिनेमैटोग्राफी उत्कृष्ट आहे. थोडक्यात काय, तर हा चित्रपट आवर्जून बघण्याचा आहे. महेश मांजरेकर आपल्या प्रत्येक चित्रपटातून एक संदेश देऊन आपल्याला जागं करण्याचं काम करत असतो. ह्या चित्रपटातूनही त्याला असाच एक संदेश द्यायचा आहे.

का पहावा: प्रत्येक कलाकाराचा दमदार अभिनय, वजनदार संवाद, सुंदर ठिकाणे, सिनेमैटोग्राफी, चित्रपटातली मसती आणि त्याचा ताजेपणा. का पाहू नये- असे कोणतेच कारण नाही.

तर मित्रांनो तुम्हाला जर पैसा वसूल करमणूक अनुभवायची असेल तर त्यासाठी हा चित्रपट लई बेस हाय!

Monday, October 10, 2011

Marathi Movie: Uladhaal


Directors: Aditya Sarpotdar
Producers: Aditya Sarpotdar
Star-Cast: Bharat Jadhav, Makarand Anaraspure, Ankush Choudhary, Siddharth Jadhav, Madhura Velankar, Aaditi Sarangdhar, Subodh Barve, Mahesh Manjrekar


Storyline: Uladhal is a thrilling - adventurous comedy about the journey of a shield (Dhaal) created in 1758 by a Great Maratha Emperor. The creation of this shield was in the honor of the noteworthy sacrifice made by a brave warrior named Somajirao. He took the blow of a spear heading towards the king during a battle and thus saved the king's life. He shielded the king from a bunch of enemies just as a powerful shield would do. Hence, as a gesture of appreciation, the king honors Somajirao by awarding him a precious shield (Dhaal). Generation after generation, Somajirao's family believes that the protection of this shield is their prime responsibility. During the course of time, countless opponents plot to steal this shield, but all their efforts prove unrewarding. However, Sayajirao, the youngest ruler of the family mistakenly misplaces the shield and eventually loses it. Will Sayajirao let this prestigious and honourable shield go away so easily?

Monday, September 12, 2011

Marathi Cinema: Mukkam Post London


Director: Kedar Shinde
Producer: Kamal Seth
Writers: Kedar Shinde
Music: 
Star-castBharat Jadhav, Mrunmayee Lagoo, Mohan Joshi


Storyline : Mukkam Post London is the first Marathi film to be shot in the Queens country. Vaijhanath Hanpanwar is a small-town guy living in Kalchoudi village near Satara. After the death of his mother, Vaijhya learns that his father Omkar Hanpanwar had left his young wife and three-year old son to earn a living in London. He finds a small box containing several uncashed cheques, flight tickets to London and many little things along with a visiting card. He decides to go there personally and return all the things to his father and come back to India. Meanwhile Omkar, who is a successful businessman in London, learns of Vaijhyas visit to London and decides to win over his son. But first he decides to test his feelings for his father. So Omkar disguises as a van driver, meets Vaijhya and promises to reach him to his fathers residence in Windsor. What follows is a series for funny and interesting incidents that happen in just two days of his visit to London. Bharat Jadhav is in the role of Vaijhanath, while Mohan Joshi, in a very different look, plays a rich businessman. He seems to have enjoyed doing this role that even has him dancing to the music along with Bharat. Both have a very good sense of timing. Mrinmayee Lagoo plays Omkars secretary Pooja who helps him in his endeavour to meet his son.
 

Sample text

Sample Text

Sample Text